भटक्या कुत्र्यांमुळे मुळशीकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

मुळशीकर सध्या भटके कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हैराण झालेत. चांदणी चौकापासुन तालुक्यात रस्त्यारस्त्यावर कुत्र्यांच्या वावर वाढलाय. याचा मुळशीकरांना प्रचंड त्रास होतोय.

कोळवण : मुळशीकर सध्या भटके कुत्र्यांच्या उपद्रवामुळे हैराण झालेत. चांदणी चौकापासुन तालुक्यात रस्त्यारस्त्यावर कुत्र्यांच्या वावर वाढलाय. याचा मुळशीकरांना प्रचंड त्रास होतोय. भटक्या कुत्र्यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलंय. या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करणे अत्यावश्यक ठरणार आहे, अन्यथा त्यांच्या हल्ल्यात नाहक निष्पाप जीव जाऊ शकतो.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

पौड चौक, शिंदेवाडी, घोटावडे फाटा, पिरंगुट घाट, भुगांव या ठिकाणी मोकाट कुत्री रस्त्याच्या बाजुला दिवसभर हिंडताना दिसतात. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्री व पहाटेेच्यावेळी रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. शिंदेवाडी येथे असणारी भटकी कुत्री अनेक दुचाकीस्वरांना चावली आहेत. दिवसेंदिवस वाढणाया कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे हाॅटेलमधील अन्न, चिकनची दुकाने, कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहान मुलांना बाहेर खेळणे जिकटीचे झाले आहे. परिसरातून जाताना येताना लहान मुले , वृध्द , महिलांना या कुत्र्यांची भीती असते. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सकाळी जाणारे कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दूधवाले, कचरा वेचणारे यांना अधिक प्रमाणात होतो. तसेच संध्याकाळी उशिरा येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागतात. त्यामुळे त्यांच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अनोळखी असणारी कुत्री पुणे शहरात पकडून पिरंगुट घाट, पौड घाट परिसरात सोडून दिली जात असल्याचे अनेक नागरीक सांगत आहेत.

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुत्र्यांच्या निर्बिजकरणासाठी लाखो रुपयांचा निधी खाजगी संस्थांकडे देते. परंतु कुत्र्यांची संख्या कमी झाली असं भासवण्यासाठी ग्रामीण हद्दीत रात्रीच्या अंधारात सोडली जातात, अशी अनेक ग्रामस्थांना शंका असुन याची गांभीर्याने सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

भटक्या कुत्र्यांचा एवढा त्रास व्हायला लागलाय की गाडी चालवत असताना मध्येच आल्याने किंवा मागे लागल्याने अपघात घडत आहेत. कुत्र्यांच्या या समस्येवर उपाय करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक ठरणार आहे, अन्यथा त्यांच्या हल्ल्यात नाहक निष्पाप जीव जाऊ शकतो.-हेमंत माझिरे(प्रवासी)

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mulshikar harassed by stray dogs