‘तुसी अपना वोट एन्ना नू पांओ’ 

रीना पतंगे 
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - दारावर असणारी सतनाम सिंग (नाव बदलेले आहे) नावाची पाटी... ही पाटी वाचून बेल वाजविली जाते... दार उघडल्यावर लगेचच मोठ्या उत्साहाने ‘ओ जी सत्‌ श्रीअकाल’ म्हणत स्वत:ची आणि इच्छुकाची ओळख दिली जाते... त्यापाठोपाठच ‘तुसी अपना किमती वोट एन्ना नू पांओ’ असे आवाहनही केले जाते. मतदार आणि इच्छुकांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये असा बहुभाषिक संवाद सध्या अनेक ठिकाणी घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विविध भाषिक मतदारांना आपलेसे करण्यासाठी इच्छुकांकडून होणारे हे प्रयत्न प्रचार तंत्राचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कन्नड, सिंधी, तमीळ, गुजराती आदी भाषा येणाऱ्या बहुभाषिक कार्यकर्त्यांसोबत इच्छुक प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. 

पुणे शहरात रोजगारासाठी इतर राज्य, प्रदेशांतील अनेक नागरिक स्थायिक झाले आहेत. यामध्ये तेलुगू, गुजराती, मल्याळ, कन्नड, पंजाबी, कोकणी आदी भाषिकांची संख्या मोठा प्रमाणात आहे. वेगवेगळ्या समाजातील, पंथातील लोकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेचेही ज्ञान असलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने इच्छुक प्रचार करताना विविध ठिकाणी दिसत आहेत. हा प्रचाराचा हटके फंडा असून, इच्छुक विविध भाषिक नागरिकांना आपलेसे करण्याचा, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बहुभाषिकतेबाबत मोदींची ‘कॉपी’
पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांमधील आपल्या प्रचार सभेत तेथील स्थानिक भाषांचा थोड्याफार प्रमाणात वापर करतात. त्यांची हीच ‘स्टाइल’ इच्छुकांकडून अवलंबिली जात आहे. ‘वण्णक्कम, वाकलिंगल’....‘नमस्कार री, नंग मतदान माडरी’.... ‘जय जिनेंद्र, मतदान करजों’ या शब्दांत घरोघरी जाऊन इच्छुक प्रचार करीत आहेत. बहुभाषिक कार्यकर्त्यांसोबत हा प्रचार होताना दिसत आहे. प्रचार करताना स्वतःचे नाव, पक्षाचे नाव, चिन्ह इतर भाषेतही बोलता यावे, यासाठी इच्छुक प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Multi-language interface between candidate & voter