महामार्गावर येणार वाहनांचा पूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

  महामार्ग तीन दिवसांपासून बंद
  कोल्हापूरजवळ ७९ हजार वाहने अडकली
  मुंबई, मजगाव बंदराजवळ रहदारी ठप्प
  अलमट्टीतील विसर्ग वाढविल्यास पूर नियंत्रणात
  पूर ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्याचे नियोजन

पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे तीन दिवसांपासून एक ते दीड लाख वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर या महामार्गावर वाहनांचा पूर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन सुरू आहे.

गेल्या दहा दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)त्यामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक मंगळवारपासून (ता. ६) बंद करण्यात आली. तिसऱ्या दिवशी ही वाहतूक बंद आहे.कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू येथून मुंबईकडे निघालेली सुमारे सत्तर हजार वाहने कोल्हापूरजवळ अडकली आहेत. तर मुंबई येथील जेएनपीटी आणि माजगाव डॉक येथून या राज्यात जाणारी वाहने बंदरातच अडकली आहेत. अशी सुमारे एक ते दीड लाख वाहने जागेवर थांबून राहिली आहेत. पूर ओसरल्यानंतर ही वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्यानंतर या महामार्गावर वाहनांचा पूर येण्याची शक्‍यता आहे.

१४ वर्षांपूर्वीच्या महापुराची आठवण
कोल्हापूर आणि सांगली परिसरात २००५ मध्ये महापूर आला होता. तेव्हा मुंबई-बंगळूर महामार्गावर पूर आला होता. त्या वेळी महामार्ग १७ तास बंद ठेवला होता. त्यानंतर यंदा प्रथमच महामार्ग तीन दिवस बंद राहिला आहे.

  महामार्ग तीन दिवसांपासून बंद
  कोल्हापूरजवळ ७९ हजार वाहने अडकली
  मुंबई, मजगाव बंदराजवळ रहदारी ठप्प
  अलमट्टीतील विसर्ग वाढविल्यास पूर नियंत्रणात
  पूर ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्याचे नियोजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Bangalore highway transport