कल्याणीनगरमार्गे मेट्रो मार्गाला स्थगितीची याचिका फेटाळली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. 

पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. 

वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे. कल्याणीनगरच्या काही  नागरिकांनी त्याला विरोध करून त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने 12 जुलै रोजी सुनावणी घेऊन ही याचिका फेटाळली आहे. यापूर्वीही दोन वेळा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मेट्रो मार्ग कल्याणीनगरद्वारे वळविण्यास स्थगितीची मागणी करण्याऱ्या जनहित याचिका दाखल करण्याचे प्रयत्न झाले होते. 

परंतु दोन्ही वेळा मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळल्या आहेत. उच्च  न्यायालयाच्या या निर्णयामुळे मेट्रो मार्गातील सर्व अडथळे निकाली निघाले असून, या मार्गावर मेट्रो मार्गाचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High Court rejects petition against stay on Kalyan Nagar Metro