पुण्याहून साताऱ्याकडे चाललाय? मग ही बातमी वाचाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच सलग दोन दिवसांची सुटी. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍याजवळ शनिवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

पुणे : मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच सलग दोन दिवसांची सुटी. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍याजवळ शनिवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई आणि पुणे शहरात राहतात. मुंबईवरून शुक्रवारी रात्री नऊ-दहा वाजण्याच्या सुमारास गावी निघालेले नागरिक खेड-शिवापूरजवळ शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास पोचतात. त्यामुळे सातारा रस्त्यावर पहाटेपासूनच वाहनांची गर्दी झाली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होती. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत वाहनांची गर्दी ओसरली.

पुन्हा उद्या रविवारपासून सलग दोन दिवस सुटी आहे. त्यामुळे आज रात्रीपासून उद्या रविवारी दिवसभर सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी राहण्याची शक्‍यता आहे.
दरम्यान, सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरळीत असून, उद्याही वाहतूक सुरळीत राहील, असे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Pune Expressway smooth but traffic near Khed Shivapur