प्रवाशांनो, मुंबई-पुणे एक्सेप्रस वे आज 'या' वेेळेत राहणार बंद; 'हा' पर्यायी मार्ग वापरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ यांच्याकडून मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मुंबई लेनवर 71 किमीचा कामशेत बोगद्याता आज सकाळी 11 ते 2 या वेळेत 'स्पीड इन्फोर्समेंच स्टिस्टम' बसविण्यात येणार असून त्यांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे एक्सप्रेस वेवरील पहिली दुसरी लेन बंद असून तिसऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरु राहील असेही सांगण्यात आले आहे.

पुणे : मुंबई-पुणे एक्सेप्रस वे आज(ता.26) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तात्रिंक कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कामशेत बोगदा येथे 'स्पीड इन्फोर्समेंच स्टिस्टम' बसविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सेप्रस वे वरील दोन्ही लेन बंद ठेवणार असून तिसऱ्या लेनवरुन वाहतूक सुरु राहील, अशी माहिती महामार्गा सुरक्षा पथक, प्रादेशिक विभाग पुणे यांच्यावतीने देण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ यांच्याकडून मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मुंबई लेनवर 71 किमीचा कामशेत बोगद्याता आज सकाळी 11 ते 2 या वेळेत 'स्पीड इन्फोर्समेंच स्टिस्टम' बसविण्यात येणार असून त्यांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे एक्सप्रेस वेवरील पहिली दुसरी लेन बंद असून तिसऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरु राहील असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान वाहतूक कोंडीं झाल्यास गरजेनुसार सर्व प्रकारची वाहने एक्सप्रेस वेवरील किवळे पुलावरुन जुना मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत.

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क

पोलिसांनी , आज11 ते 2 या वेळेत पुण्याकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांना आवाहन केले आहे की, कामशेत बोगद्यातून कमी वेगाने वाहने चालावावी.

भाजपला मोठा झटका; जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune Expressway will Remains Closed between 11 to 2 Am Today