मुबंई-पुणे रेल्वेचा ब्लाॅक; ३१ डिसेंबरपर्यंत 'या' गाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

घाट सेक्शनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान रेल्वेच्या 'अप' लाइनवरील रेल्वे किलोमीटर क्रमांक ११७ जवळ रेल्वेच्या बोगदा क्र.४६ पुढील पुलाचा भराव खचला आहे. बोरघाट सुरक्षित करत बोरघाटातील रेल्वेसेवा पंधरा जानेवारी पर्यंत शंभर टक्के सुरु करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वेच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

लोणावळा : लोणावळा ते कर्जत दरम्यान बोरघाटात मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रेल्वे सेवा ३१ डिसेंबर पर्यंत विस्कळीतच राहणार आहे. रेल्वेच्या वतीने पाच गाड्या ३१ डिसेंबर पर्यंत रद्द केल्या असून काही गाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

सासवडमध्ये विवाहितेचा पैशांच्या लोभापायी छळ 

घाट सेक्शनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मंकीहील ते नागनाथ केबीन दरम्यान रेल्वेच्या 'अप' लाइनवरील रेल्वे किलोमीटर क्रमांक ११७ जवळ रेल्वेच्या बोगदा क्र.४६ पुढील पुलाचा भराव खचला आहे. बोरघाट सुरक्षित करत बोरघाटातील रेल्वेसेवा पंधरा जानेवारी पर्यंत शंभर टक्के सुरु करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वेच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

तरुणाचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न 

सध्या लोणावळा ते कर्जत दरम्यान बोरघाटात 'अप' लाइनवरील वाहतूक पुर्णपणे बंद असून मुंबईकडे जाणारी वाहतुक 'मिडल' आणि 'डाऊन' लाइनने वळविण्यात आली आहे. यामार्गावर वाहतूक वाढल्याने रेल्वेच्यावतीने लांब पल्ल्याच्या पाच गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे. मुंबई-पंढरपुर ही गाडी २८ डिसेंबरला तर पंढरपुर-मुंबई पॅसेंजर ही २९ डिसेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. 

वेश्‍याव्यवसायप्रकरणी हॉटेलचालकास कोठडी

३१ डिसेंबर पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या
५१०२९ मुंबई-विजापुर पॅसेंजर
५१०३० विजापुर-मुंबई पॅसेंजर
५१३१७ पनवेल-पुणे पॅसेंजर
५१३१८ पुणे-पनवेल पॅसेंजर

दौंड-मनमाड मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या
११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस
११०२६ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस

पुणे पर्यंत धावणाऱ्या गाड्या (या गाड्या ३१ डिसेंबर व २ जानेवारी पर्यंत पुर्वव्रत होतील)
११०३० कोल्हापुर-मुंबई कोयना एक्स्प्रेस
१७३१७ हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस
१२७०२ हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
१८५१९ विशाखापट्टनम-एलटीटी एक्स्प्रेस
१७६१४ नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
०७६१७ नांदेड-पनवेल साप्ताहीक

पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या 
११०२९ कोल्हापुर-मुंबई कोयना एक्स्प्रेस
१७३१८ हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस
१२७०१ हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
१८५२० विशाखापट्टनम-एलटीटी एक्स्प्रेस
१७६१३ नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
०७६१८ नांदेड-पनवेल साप्ताहीक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Pune Railway Blocks Until 31 December