मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पुन्हा विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

लोणावळा : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी ते पळसदरी (किलोमीटर क्र.१०६) दरम्यान रेल्वेमार्गावर दरड कोसळली. सोमवारी साडेचारच्या सुमारास दरड कोसळली असून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला आहे.

दोन दिवसांपूर्वीच (ता.२७) मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळली होती. विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पुन्हा रुळावर येत नाही तोच, परत एकदा डाऊन लाईनवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

पुण्याकडे येणारी १६३३१ - त्रिवेंद्रम एक्स्प्रेस पळसदरीजवळ, ११०७१ -लोकमान्य टिळक टर्मिनस चेन्नई एक्स्प्रेस कर्जत यार्डात, ११०४१ - एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस कर्जत स्टेशनवर, ११००९ - सिंहगड एक्स्प्रेस भिवपूर स्थानकावर उभ्या आहेत.

 रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे रुळावर आलेले भले मोठे दगड हटविण्याचे काम सुरु असून रेल्वे सेवा लवकरच पुर्ववत होईल ,अशी शक्यता रेल्वे प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Pune railway line disrupted due to landslide in borghat