ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईचे पार्लेस्वर पथक प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम, पुण्याच्या शिवसाम्राज्य पथकाने द्वितीय; तर चिपळूणच्या काळभैरव पथकाने तृतीय क्रमांक मिळविला. शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवाअंतर्गत डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते. 
 

पुणे - राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने प्रथम, पुण्याच्या शिवसाम्राज्य पथकाने द्वितीय; तर चिपळूणच्या काळभैरव पथकाने तृतीय क्रमांक मिळविला. शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवाअंतर्गत डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

नातूबाग मैदानावर स्पर्धेची महाअंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा आयोजिला होता. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, उद्योजक बालाजी राव, जगदीश राव, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत, ऍड. प्रताप परदेशी, बाबू वागस्कर, अनिल जाधव, पराग ठाकूर, ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, कलाकार नेहा गद्रे, वैष्णवी पाटील, प्राजक्ता गायकवाड, सचिन गवळी उपस्थित होते. 

भिवंडीचे शिवाजीनगर पथक आणि पुण्याच्या ऐतिहासिक पथकाने स्पर्धेत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. याशिवाय वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलवादक म्हणून पार्लेस्वर पथकाचा शुभम कोंढाळकर, ताशावादक म्हणून वसईच्या आविष्कार पथकाचा रूपेश कदम, ध्वजधारी म्हणून शिवाजीनगर पथकाची भाग्यश्री चौगुले यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट तालाचे पारितोषिक देवगडच्या रवळनाथ पथकाला प्रदान करण्यात आले. गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अश्‍विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Mumbais Parlesvar Pathak first in the Dhol Tasha Mahakarandak competition