चालकांचा बेशिस्तपणा जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंढवा - मुंढव्यातील वाहतूक समस्या बेशिस्त वाहनचालकांमुळे दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा असतानाही पोलिसांकडून तसे होताना दिसत नाही. 

महात्मा फुले चौकात अपघातांत प्राण गमावण्याचे प्रमाण वाढत चालले असून, बेशिस्त वाहतूक हे त्यामागे कारण आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारली पाहिजेच; पण त्याचबरोबर खासगी वाहतुकीला शिस्त लागणेही आवश्‍यक आहे. 

या भागात बेशिस्त वाहनचालकांमुळे इतर वाहनचालकांना, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या भागात दुचाकी वाहने जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एकेरी रस्ते केले, वळणे बंद केली. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला. 

याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, ‘‘मुंढवा जंक्‍शनवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. खराडी, मगरपट्टा घोरपडीकडून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. सर्वांनी वाहनांचे नियम पाळल्यास सर्वच वाहनचालकांना त्याचा फायदा होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदतच होईल.’’

इतरांनाही रस्ता वापरण्याचा हक्क आहे, हेच अनेक वाहनचालक विसरतात. त्याचा सर्वाधिक फटका पादचाऱ्यांना बसतो. चौकांत, रस्त्यांवर काही चालक बेशिस्तपणे वाहने पुढे दामटतात. त्यांच्यामुळे अन्य वाहनचालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात घडतात. 
- दिलीप झगडे, रहिवासी, शंकरनगर 

केशवनगर-मुंढवा भागात रोज किरकोळ अपघात होत असतात. चारचाकी वाहनांमधून, बसगाड्यांच्या उजव्या बाजूने वाहन नेण्याची कसरत करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने वाहने पुढच्या वाहनांना धडकतात.
- दादा आहिरे, रहिवासी, चांगभलं निवास

Web Title: mundhawa dangerous transport driver