शहरातील ३६० गाळे वाटपाअभावी पडून

अवधूत कुलकर्णी
शुक्रवार, 22 जून 2018

पिंपरी - महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील १३ मंडईंमध्ये ९४३ गाळे बांधले आहेत. त्यापैकी ५८३ गाळ्यांचे वाटप झाले आहे. परंतु अद्याप ३६० गाळ्यांचे वाटप न झाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्याचा फटका पर्यायाने विकासकामांना बसत आहे.

पिंपरी - महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील १३ मंडईंमध्ये ९४३ गाळे बांधले आहेत. त्यापैकी ५८३ गाळ्यांचे वाटप झाले आहे. परंतु अद्याप ३६० गाळ्यांचे वाटप न झाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्याचा फटका पर्यायाने विकासकामांना बसत आहे.

शहराच्या अनेक भागांत पूर्वी रस्त्याच्या कडेला विक्रेते भाजी विकत असत. नागरिकांना एकाच ठिकाणी योग्य प्रकारे भाजी घेता यावी आणि विक्रेत्यांचीही सोय व्हावी, या हेतूने महापालिकेच्या वतीने भाजी मंडई बांधण्यात आल्या. परंतु हे करताना चिंचवड, पिंपरी, आकुर्डीसारख्या काही मंडई योग्य ठिकाणी बांधल्याने त्याच्या गाळ्यांची विक्री झाली अथवा त्यापासून भाडेपट्ट्याद्वारे महापालिकेला उत्पन्न मिळू लागले. चिंचवडमधील मासळी बाजाराची इमारत गेल्या तीन- चार वर्षांपासून धूळ खात पडून आहे. तेथे अस्वच्छताही आहे. 

रस्त्यावरच व्रिकेते मासे विकत असल्याने रहदारीलाही अडथळा होतो. त्यांना महापालिकेने गाळ्यांमध्येच विक्रीची सक्ती केल्यास गाळ्यांचा प्रश्‍नही मार्गी लागू शकेल. काही मंडईंच्या ठिकाणी वर्दळ नाही. त्यामुळे अशा मंडईंमधील गाळ्यांबाबत वरच्यावर निविदा मागवूनही विक्रेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे नागरिकांना नाहक माशांची दुर्गंधी सहन करावी लागते. वाहतुकीलाही अडथळा होतो. त्यामुळे मासळीसाठी स्वतंत्र बाजार सुरू करायला हवा.
 - सुचेता शिंदे, नागरिक, चिंचवड

चिंचवडमधील मासे बाजाराच्या गाळ्यांचे वाटप का रखडले, याबाबत माहिती नाही. त्याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्राधिकरणानेही वाकड येथे १८४ गाळे असलेली व भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये असलेली ९० गाळ्यांची भाजी मंडई बांधली आहे. या दोन्ही इमारतींचे महापालिकेकडे हस्तांतर केले आहे. लवकरच त्यांच्या निविदा काढून गाळ्यांचे लिलाव करण्यात येतील.
- मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग

Web Title: municipal 360 shops empty