तुळशीबाग आणखी नटणार

Tulshibag
Tulshibag

पुणे - तुळशीबाग म्हटलं की दागिने, कपडे, गृहोपयोगी वस्तू  खरेदी करण्याचे महिलांच्या हक्काचे ठिकाण. बाराही महिने महिलांना ‘शॉपिंग’साठी उपलब्ध असणाऱ्या तुळशीबागेचा आता कायापालट होणार आहे. सध्या येथे शॉपिंगबरोबरच गर्दी, धक्काबुकी हे चित्र पाहायला मिळते. परंतु लवकरच तुळशीबागेचे रूप बदलणार असून सुसज्ज अशी शॉपिंग हब साकारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आणि गणपती, शंकर, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि दत्तात्रयांच्या मंदिरांसाठी पेशवेकालीन तुळशीबाग प्रसिद्ध आहे. पारंपारिक साहित्य, कॉस्मेटिक, ज्वेलरी आणि नित्य गृहोपयोगी वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण अशी देखील याची ओळख आहे. महिला आणि युवतींना तुळशीबागेचे विशेष आकर्षण आहे. तुळशीबागेत दिवसभरात दीड-दोन लाख नागरिक भेट देत असल्याचा अंदाज आहे. मात्र, असे असतानाही येथे नागरिकांसाठी पुरेशी सोय उपलब्ध नसल्याचे दिसून येते. परिणामी येणाऱ्या नागरिकांना गर्दी, धक्काबुक्की सहन करावी लागते. तसेच काही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नसल्याने अनेकांची निराशाही होत असल्याचे निदर्शनास येते. हे लक्षात घेऊन आता महापालिकेने एक पाऊल पुढे टाकायचे ठरविले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या तुळशीबाग आणि परिसराचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसन करण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात सुटसुटीत दुकाने, प्रत्येक दुकानांमध्ये विशिष्ट अंतर, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, अशी सुसज्ज असलेली तुळशीबाग लवकरच साकारली जाणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com