मनपा आयुक्त अकार्यक्षम आणि निर्णय क्षमता नसलेले; मनसेचे आयुक्तांवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

महापालिकेने अनलॉकच्या पहिल्या टप्प्याची नियमावली जाहीर केली. मात्र त्याची अंमलबजावणी कोण करणार याची स्पष्टता केली नाही. त्यामुळे शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. यातून मनपा आयुक्त शेखर गायकवाड हे अकार्यक्षम व निर्णय क्षमता नसलेले आयुक्त असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

पुणे - महापालिकेने अनलॉकच्या पहिल्या टप्प्याची नियमावली जाहीर केली. मात्र त्याची अंमलबजावणी कोण करणार याची स्पष्टता केली नाही. त्यामुळे शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. यातून मनपा आयुक्त शेखर गायकवाड हे अकार्यक्षम व निर्णय क्षमता नसलेले आयुक्त असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनलॉक एकच्या नियमावलीत लक्ष घालून त्याची अंमलबजावणी हाती घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना दिले आहे. त्या निवेदनात आयुक्त गायकवाड यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शहरातील कोरोना बाधित आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. नागरिकांच्या हितासाठी नियमावली जाहीर करताना त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी देखील पालिकेला घ्यावी लागेल. केवळ नागरिकांना दोष देऊन चालणार नाही. नियम मोडणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यामुळेच त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मात्र कारवाई कोणी करायची याबाबत स्पष्टता नसल्याने त्याचा परिणाम शहरावर दिसून येत आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राजू शेट्टींनी आमदारकी स्वीकारायची की नाही, हे कोण ठरविणार?

याबाबत संभूस यांनी सांगितले की, पालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना बरोबर घेऊन जनतेसमोर ही नियमावली जाहीर करणे आवश्यक होते. मात्र अकार्यक्षम आयुक्तांमुळे या नियमांची अंमलबजावणी फसली. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पाठवण्यात आल्याचे संभूस यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner is inefficient and lacks decision making ability MNS