जुनी सांगवीत व्यावसायिक बांधकामावर पालिकेची कारवाई

रमेश मोरे
मंगळवार, 15 मे 2018

काची यांच्या जागेसमोर भाऊबंदकीने 3000 स्के.फुट जागेत घर व व्यावसायिक बांधकाम केलेले असुन काची यांना रस्ता नसल्याने त्यांनी गेल्या सहा वर्षापासुन मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी, यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर गेल्या सहा वर्षापासुन जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात ते दाद मागत होते.

जुनी सांगवी (पुणे) - प्रियदर्शनीनगर येथील भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या वादातील बांधकामावर मंगळवार ता. १६ पालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. येथील रहिवाशी सौ.सरिता ज्ञानोबा काची या स्वताच्या जागेतील वहिवाट रस्त्यासाठी गेली सहावर्षापासुन न्यायालयीन लढा देत होत्या. 

काची यांच्या जागेसमोर भाऊबंदकीने 3000 स्के.फुट जागेत घर व व्यावसायिक बांधकाम केलेले असुन काची यांना रस्ता नसल्याने त्यांनी गेल्या सहा वर्षापासुन मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी, यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर गेल्या सहा वर्षापासुन जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात ते दाद मागत होते.

सातबाराप्रमाणे मुळ १६७० स्क्वे.फुट जागेवर खोट्या नोंदी लावुन तिन हजार स्क्वे.फुट अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार त्यांनी विविध विभागांकडे केली होती. पालिका व स्थानिक प्रशासन अधिका-यांवर ही त्यांनी साटेलोटे केल्याचा आरोप केला होता. तर काची यांनी गेल्या सहावर्षात ५१३ तक्रार अर्ज विविध विभागांकडे केले होते. यावर मुख्यमंत्री कार्यालय, प्रधान सचिव, नगरविकास विभागाकडुन पिंपरी चिंचवड महापालिकेस उचित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही कारवाईस विलंब होत असल्याने सोमवार ता.१५ सौ.सरीता काची यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. अखेर दुस-या दिवशी येथील बांधकामावर मोठ्या पोलिस बंदोबस्तासह कारवाईस सुरूवात करण्यात आली. या व्यावसायिक बांधकामात दोन बंकाचे एटीएम  केंद्र, एक हॉटेल होते. एटीएम मशीन हलविण्यासाठी संबंधित बँकांना पाचारण करण्यात आले होते. व्यावसायिक बांधकामावर कारवाई करत एटीएम केंद्र, हॉटेल गाळे मोकळे करून सायंकाळी साडेचार पर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी अतिक्रमण विभागाचे अभियंता मनोज सेठिया यांनी येथिल व्यावसाईक बांधकामवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Municipal corporation action on commercial construction