महापालिकेला ‘सीएसआर’चा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. 

पुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. 

उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर त्यांना करसवलत देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली. काही उद्योग आणि व्यावसायिक हे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून; तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सीएसआरचा निधी खर्च करीत आहेत. पुणे सिटी कनेक्‍ट, आदर पूनावाला फाउंडेशन, फिनोलेक्‍स ग्रुप, मुकुल माधव फाउंडेशन, इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन, मेंटर टुगेदर, विज्ञान आश्रमशाळा, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, भारत फोर्ज लि., ज्ञानप्रबोधिनी, ग्रेट फाउंडेशन, सायन्स फॉर ऑल फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, स्टेट अप फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन, आय टीच यांच्यामार्फत कामे सुरू आहेत. ही कामे कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. सीएसआरच्या कामांचे प्रमाण वाढले, तर महापालिकेचे मनुष्यबळ, निधी आदींची बचत होण्यास आणि कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.

शहरात आदर पूनावाला फाउंडेशनतर्फे स्वच्छतेचे काम सुरू आहे. या संस्थेकडून यांत्रिक पद्धतीने सफाई केली जाते. यामुळे मनुष्यबळ कमी लागते. त्याचा उपयोग महापालिकेला होत आहे. 
- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन

‘डिजिटल लिटरसी’चे प्रशिक्षण 
पुणे सिटी कनेक्‍टच्या सहकार्याने चार ठिकाणी ‘लाइट हाउस’ प्रकल्प सुरू आहे. वस्ती पातळीवर ‘डिजिटल लिटरसी’साठी २६ ठिकाणी मोबाईल बसद्वारे संगणक प्रशिक्षण दिले जात आहे.

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
आरोग्य विभागाअंतर्गत सोनवणे हॉस्पिटल आणि राजीव गांधी रुग्णालय येथे नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग चालविण्यात येतो. हे विभाग गेल्या महिन्यात सुरू झाले आहेत.

Web Title: municipal CSR suport