पहिल्या शिक्षण समितीवर नऊ सदस्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पिंपरी - शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर नऊ नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपकडून सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची शुक्रवारी (ता. २२) या समितीवर निवड करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी ही निवड जाहीर केली. दरम्यान, पहिला शिक्षण समिती सभापती होण्याचा मान मिळविण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्यानंतर १३ मार्च २०१७ रोजी महापौर निवडीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आले. बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये त्याच वेळी शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. तथापि, महापालिका आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त झाल्याचे आदेश काढले नव्हते. शाळा सुरू होण्याच्या कालखंडात म्हणजेच २ जून २०१७ रोजी आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्याच्या आधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारी स्वतःच्या अधिकार कक्षेत घेतले.

विधी समिती रिक्त जागी निवड
विधी समितीच्या रिक्त असलेल्या एका जागेवर सागर गवळी, तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या रिक्त असलेल्या एका जागेवर कुंदन गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. या सर्व सदस्यांचे महापौर नितीन काळजे यांनी अभिनंदन केले.

Web Title: municipal education committee nine member selection