अंतिम निकाल दुपारी दोनपर्यंत अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण; ११ ठिकाणी व्यवस्था

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या गुरुवारी (ता.२३) होणाऱ्या मतमोजणीसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात जय्यत तयारी झाली आहे. प्रत्येक निवडणूक कार्यालयात सरासरी तीन प्रभागांची मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ३२ प्रभागांतील १२७ जागांची मतमोजणी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तथापि, ज्या प्रभागांमध्ये जास्त संख्येने उमेदवार आहेत, तेथे जादा वेळ लागण्याची शक्‍यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण; ११ ठिकाणी व्यवस्था

पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या गुरुवारी (ता.२३) होणाऱ्या मतमोजणीसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात जय्यत तयारी झाली आहे. प्रत्येक निवडणूक कार्यालयात सरासरी तीन प्रभागांची मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ३२ प्रभागांतील १२७ जागांची मतमोजणी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तथापि, ज्या प्रभागांमध्ये जास्त संख्येने उमेदवार आहेत, तेथे जादा वेळ लागण्याची शक्‍यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शहरात ११ लाख ९२ हजार ८९ मतदार आहेत. पैकी सात लाख ७९ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. 

मतमोजणीसाठी निवडणूक कार्यालयनिहाय मंडप उभारले आहेत. स्ट्राँगरूममध्ये मतपेट्या सील करून ठेवलेल्या आहेत. प्रभागनिहाय मतपेट्या बाहेर काढून मतमोजणी केली जाईल.

विजेत्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र
मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक प्रभागाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर टाकला जाईल. त्यानंतर विजेत्या उमेदवारांचे ऑनलाइन प्रमाणपत्र तयार होईल. ते निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. 

प्रथम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर
निवडणूक कार्यालयांमध्ये एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक प्रभागाचा फेरीनिहाय निकाल कळवतील. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निकालाबाबतची माहिती टाकल्यानंतर अंतिम निकाल घोषित करता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले.

अशी होईल मतमोजणी 
एका वेळी एका प्रभागाची मतमोजणी. त्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी
प्रत्येक प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी लागणारा अवधी : सरासरी १ ते २ तास
प्रत्येक प्रभागनिहाय होणाऱ्या अंदाजे फेऱ्या : ४ ते ७ 
प्रत्येक फेरीत मोजली जाणारी मते : सुमारे ४ ते ५ हजार
प्रत्येक फेरीसाठी लागणारा अवधी : १० ते २० मिनिटे
प्रत्येक प्रभागाला किती टेबल : सरासरी १४ 
प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर, २ मतमोजणी असिस्टंट 
निवडणूक कार्यालयनिहाय अंतिम निकाल अपेक्षित : दुपारी दोनपर्यंत 
जादा उमेदवार असलेल्या प्रभागांसाठी लागणार जादा वेळ 
चोख पोलिस बंदोबस्त, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात
प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ मीडिया सेंटर
महानगरपालिका भवनात मध्यवर्ती मीडिया सेंटर कार्यान्वित
मतमोजणी कक्षाबाहेरील ध्वनिवर्धकावरून नागरिकांना कळणार निकाल 

येथे होईल मतमोजणी

ठिकाण    प्रभाग
१) स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, स्पाइन रस्ता, १, २, ११
पेठ क्रमांक १८, कृष्णानगर.
२) संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी. ३, ६, ८
३) अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी. ४, ५, ७
४) ‘क’ प्रभाग कार्यालय, एमआयडीसी, भोसरी. ९, १०, २०
५) अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन, पेठ क्रमांक २६, निगडी-प्राधिकरण.  १२, १३, १४
६) हेडगेवार भवन, पेठ क्रमांक २६, प्राधिकरण. १५, १६, १७
७) ‘ब’ प्रभाग कार्यालय, पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, चिंचवड. १८, १९, २१
८) नवीन महापालिका शाळा इमारत, थेरगाव करसंकलन कार्यालयाशेजारी, थेरगाव. २२, २३, २७
९) ‘ड’ प्रभाग कार्यालय, रहाटणी. २४, २५, २६ 
१०) साई शारदा महिला आयटीआय, कासारवाडी. २८, २९, ३०
११) पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी. ३१, ३२

Web Title: municipal election final result afternoon