
बारामतीत प्रारुप मतदार याद्या जाहिर, 1 जुलैपर्यंत हरकती घेता येणार...
बारामती : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी नगरपालिकेने प्रसिद्ध केली असून, त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. या मतदार यादीबाबत कोणाला काही सूचना व हरकती द्यायच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात 1 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत नगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. या मुदतीनंतर येणाऱ्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रारुप मतदार यादी मधील लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदार यादी मध्ये नावे चुकून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे आदी सुधारणा या माध्यमातून करता येतील. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बारामती नगरपालिकेने प्रभाग 1 ते 20 या प्रभागांच्या प्रारुप मतदार यादया तयार केल्या आहेत. सदरच्या मतदार याद्या नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या शिवाय बारामती नगरपालिकेच्या संकेतस्थळावर देखील या मतदार याद्या उपलब्ध असून त्या नागरिकांना डाउनलोड देखील करता येणार आहेत. ज्यांना या मतदार यादी संदर्भात काही सूचना किंवा हरकती असेल त्यांनी त्या वेळेत सादर कराव्यात असे आवाहन महेश रोकडे यांनी केले आहे.
Web Title: Municipal Elections Voter Lists Announced In Baramati Objections Till July 1 Mahesh Rokade Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..