कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावर येत्या आठवडाभरात स्वच्छताविषयक कामांमध्ये सुधारणा आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले. 

महापालिका भवनातील आयुक्त दालनात अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जगताप व लांडगे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

जगताप म्हणाले, ‘‘नदीच्या कडेने राडारोडा टाकण्यात येतो. त्याची जबाबदारी कोणाची आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी. मोकाट जनावरे, कुत्रे व डुकरे यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांस सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करावी. रस्ते व साफसफाई नियमित करण्यात यावी. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. शाळा व ओपीडी यांना कलर कोड करावा. विद्यार्थ्यांमधून खेळाडू घडावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी जलतरण तलावासह क्रीडा सुविधा मोफत द्याव्यात.’’ लांडगे म्हणाले, ‘‘मराठी शाळांना करामध्ये सवलत द्यावी. अपंग शाळांना कर माफी द्यावी. सार्वजनिक शौचालयांची देखभाल व्यवस्थित व्हावी.’’

चर्चेतील विषय
अनधिकृत नळ जोड, शहरातील वाहतुकीबाबत डावी बाजू मोकळी करणे, प्रत्येक किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूस मुतारी वा शौचालय उभारणे व त्याची देखभाल व्यवस्थित करणे. शाळांचा दर्जा उंचावणे, अनधिकृत फलक, अनधिकृत बांधकाम, हॉकर्स झोन, भाजी मार्केट सुधारणा, महापालिकेचे दवाखाने व ओपीडी अद्ययावत करणे आदी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. 

Web Title: Municipal Employee Crime MLA Jagtap and Landage