पालिकेचा पूरनियंत्रण कृती आराखडा तयार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पिंपरी - संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालयांकडे कामाचे वाटप करण्यात आले आहे.

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षासाठी २४ तास वायरलेस ऑपरेटर, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पूरनियंत्रण कक्षासाठी २४ तास अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या आराखड्यामध्ये विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये अग्निशामक विभागाने आवश्‍यक सर्व बचावाची उपकरणे, वाहने व साहित्य सुस्थितीत ठेवावे. आवश्‍यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. पूरस्थितीत नदीघाटावर व नेमणुकीच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करावे. स्थापत्य, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करावी.

महापालिका हद्दीतील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे. अतिक्रमण विभागाचे एक वाहन व २४ तास अधिकारी व कर्मचाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यालयात सज्ज ठेवावे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. पुलावर पाणी पातळीदर्शक फलक लावावे. आदी सूचनांचा समावेश आहे.

शहरात संभाव्य पूरस्थितीत जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय कार्यालयनिहाय पूरनियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त

Web Title: municipal flood control plan