शहर स्वच्छतेची महापालिकेकडून हमी

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ‘थ्री स्टार’ रेटिंगसाठी महापालिका प्रस्ताव पाठविणार आहे. या प्रस्तावानुसार शहर शंभर टक्के स्वच्छ ठेवण्याची हमी दिली जाणार आहे. 

देशभरातील शहरे कचरामुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने स्टार रेटिंगची संकल्पना जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करून त्यांना थ्री स्टार, फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार रेटिंग दिले जाणार आहे. त्यापैकी काही रेटिंगचे मूल्यांकन राज्य सरकार करणार असून उर्वरित रेटिंगचे मूल्यांकन केंद्र सरकारच्या वतीने त्रयस्थ संस्था करणार आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन, निर्मितीच्या जागी कचऱ्याचे वर्गीकरण, सार्वजनिक, व्यावसायिक व निवासी भागातील दैनंदिन साफसफाई, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, स्वच्छतेसंदर्भातील ऑनलाइन तक्रारींचे निवारण करणे, नदी, नाले, तलावांची स्वच्छता करणे, शहरातील नागरिक व संस्थांना यूजर चार्जेस लागू करणे आणि प्लॅस्टिक बंदी लागू करणे, आदी निकषांच्या पाहणीच्या आधारे हे रेटिंग दिले जाणार आहे. त्यानुसार थ्री स्टार रेटिंगसाठी आवश्‍यक निकषांची शंभर टक्के पूर्तता करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे सरकारला पाठविला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com