एलबीटीतून पालिकेला 825 कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - स्थानिक संस्था करातून (एलबीटी) महापालिकेला गेल्या महिन्यात 112 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ऑक्‍टोबरअखेर 825 कोटी
रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. एलबीटीच्या कर वसुलीत महापालिकेने राज्यात आघाडी घेतली आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षी एलबीटीची उलाढाल मर्यादा वाढविल्यानंतर उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची भीती होती. महापालिकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून दर महिन्याला नियमितपणे अनुदान दिले जात आहे. एलबीटी लागू झाल्यापासून पुणे महापालिकेने कराच्या वसुलीत राज्यात आघाडी घेतली आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबरपर्यंतच्या सात महिन्यांत 825 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे. गेल्या महिन्यात 112 कोटी 61 लाख रुपयांचा एलबीटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे, अशी माहिती एलबीटीचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
गेल्या वर्षी महापालिकेला एलबीटीतून सर्वाधिक 1 हजार 465 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा, एलबीटीतून पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळण्याची पालिकेची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने, गेल्या तीन वर्षांतील विवरणपत्रे सादर न करणाऱ्या तब्बल 40 हजार व्यापाऱ्यांना नुकत्याच नोटिसा
बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार असल्याचेही मोळक यांनी म्हटले आहे.

Web Title: municipal income in lbt