नाले दुरुस्तीसाठी पालिका गंभीर नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

प्रशासनाकडे माहितीचा अभाव; स्थायी समितीसमोर ९८ लाखांचा प्रस्ताव

पुणे - पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि साफसफाईची कामे हाती घेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र सध्या नेमकी किती लांबीच्या नाल्यांची दुरुस्ती गरजेची आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. असे असले तरी या कामांसाठी सुमारे ९८ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी नाले आणि पावसाळी गटारांची साफसफाई केली जाते. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) सुमारे ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवेळी पावसाळ्यामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तसेच उपनगरांमधील शेकडो घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या होत्या. नाले आणि गटारांची साफसफाई न केल्यामुळे या घटना घडल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच अंबिल ओढा परिसरातील नाल्यात वाहून गेल्याने एका मुलाची मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्याची गटरांची पाहणी करून त्यांच्या दुरुस्तीचा कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. प्रत्यक्षात दीड-पावणेदोन वर्षे झाली तरी, त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे किती लांबीचे नाले आणि गटारे आहेत, त्यातील कोणत्या भागातील नाल्यांच्या दुरुस्तीची गरज आहे, याची माहिती संबंधित खात्यांकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाल्याच्या दुरुस्तीसाठी यंदा पुन्हा लाखो रुपयांची उधळपट्‌टी होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा
पावसाळा सुरू होण्यापूर्वी साधारण महिनाभर आधी गटारे आणि नाल्यांची साफसफाई व दुरुस्ती केली जाते. मात्र गेल्या वर्षी याकडे दुर्लक्ष आले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ही कामे सुरू करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमुळे ही कामे रखडल्याचे स्पष्ट झाले होते. यंदा ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal not serious for dranage repairing