महापालिकाच देणार पीएमपीला बसगाड्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पिंपरी - दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही बस खरेदी करण्यास पीएमपीकडून विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी स्वतः बस खरेदी करून पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) देण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीने घेतला आहे. तो विषय सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात पीएमपीची बससेवा सुरू आहे. दोन्ही महापालिकांमध्ये पीएमपीसाठी बस खरेदी करण्याचे ६०:४० असे प्रमाण ठरले आहे. त्याबाबतचा ठराव २३ ऑगस्ट २०१६ रोजी झाला आहे.

त्यानुसार १५५० बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. यापैकी ५५० वातानुकूलित बस केंद्र सरकार अंगीकृत असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग (एएसआरटीयु) संस्थेकडून घेण्यात येणार आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये ठरलेल्या ६०:४० धोरणानुसार १०० बस खरेदी करण्यात येणार आहेत. उर्वरित ९०० बस महापालिकेने खरेदी करून पीएमपीला द्याव्यात, असा विषय स्थायी समोर होता. गेल्या दोन वर्षांत पीएमपीने केवळ २०० बस खरेदी केल्या आहेत.

त्याचा सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच उर्वरित बस खरेदीसाठी पीएमपीवर अवलंबून राहिल्यास त्यांच्याकडून आणखी विलंब होऊ शकतो. तो टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या मागणीनुसार लेखा विभागाच्या बस खरेदी तरतुदींमधून ९०० बस खरेदी करून पीएमपीला उपलब्ध करून द्याव्यात. या विषयास धोरणात्मक बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.

Web Title: municipal pmp bus