‘जायका’ वरुन पालिका अडचणीत

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - ‘जायका’ प्रकल्पावरून पुणे महापालिका अडचणीत आली आहे. येत्या दोन दिवसांत या प्रकल्पाची निविदा रद्द करण्याबाबतचे ठोस कारण दिले नाही, तर प्रकल्पासाठी मंजूर केलेला केंद्र सरकारच्या हिश्‍शाचा निधी रद्द करू, असा दम केंद्र सरकारने महापालिकेला दिला आहे. या प्रकल्पास मान्यता मिळून दोन वर्षांनंतरही निविदा प्रक्रिया पारदर्शीपणे राबविता न आल्यामुळे महापालिकेवर ही वेळ आली आहे.

शहरातील नदी सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ९९० कोटी खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ८४० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. पाच टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्यासाठी महापालिकेकडून निविदादेखील मागविण्यात आल्या. मात्र या निविदा वाढीव दराने आल्यामुळे वाद निर्माण झाला. 

फेरनिविदा काढण्यासाठी किमान ११ महिन्यांचा कालावधी लागणार, या वर्षी मंजूर केलेला ४३ कोटी रुपयांचा निधी वापरण्याचा कालावधी संपुष्टात येणार आहे.प्रकल्पात वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भविष्यात महापालिकेस मंजूर केलेला हा प्रकल्प रद्द करावा लागणार आहे, असे जलशक्ती विभागाचे सचिव उपेंद्रपाल सिंह यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यामुळे महापालिकेत दिवसभर हा चर्चेचा विषय होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com