कुटुंबातील सहा व्यक्‍तींना अपघाती विम्याचा लाभ

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - नियमित मिळकतकर भरणाऱ्या व्यक्‍तीच्या कुटंबातील सहा व्यक्तींना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबप्रमुखासह पत्नी, आई-वडील आणि दोन मुलांना त्यात सामावून घेतले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. तसेच, या योजनेच्या जागृतीसाठी मिळकतकराच्या बिलावरच तिची माहिती देण्यात येणार आहे. 

मिळकतधारक आणि त्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मिळतील. तसेच, कुटुंबातील २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना अडीच झाल्यास लाख रुपये देण्यात येतील. जखमी सदस्याला वर्षात एक लाख मिळणार आहेत. पूर्णत: अपंगत्व आल्यास पाच लाख मिळतील. 

पहिल्या वर्षी योजनेतून केवळ मिळकतधारकालाच लाभ देण्याची तरतूद होती. त्यात, ८५ रुपये प्रिमियम होता. त्यानुसार गेल्या वर्षी १५ जणांना त्याचा फायदा झाला. या पार्श्‍वभूमीवर कुटुंबातील अन्य सदस्यांनाही योजनेत सामावून घेण्याचा प्रस्ताव आरोग्य खात्याने स्थायीपुढे ठेवला होता. तो मंजूर केल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले. अपघात विमा योजनेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी, यासाठी जागृती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विम्याच्या ‘प्रिमियम’मध्ये दहा रुपयांची कपात केली असून, ती आता ७५ रुपये असेल,’’ असेही कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com