आचारसंहितेमुळे योजना लांबणीवर

Pune Municipal
Pune Municipal

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदी सुधारणा योजना (जायका) या तब्बल पावणेआठ हजार कोटींच्या योजनांची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. शिवाय, महापालिकेने आखलेले छोटे-मोठे 20 ते 25 प्रकल्प रखडणार आहेत. एचसीएमटीआर आणि जायका प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील कामांच्या निविदा काढल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीच्या आधी मार्गी लावण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न आहे.

ज्या प्रकल्पांच्या कामांसाठी "वर्क ऑर्डर' मिळालेली नाही अशा प्रकल्पांची कामे सुरू करता येणार नाहीत, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गेल्या काही दिवसांत प्रकल्पांची घोषणा, भूमिपूजन आणि उद्‌घाटनांचा सपाटा लावला. वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून आखलेल्या सुमारे 6 हजार 600 कोटी रुपयांच्या "एचसीएमटीआर' प्रकल्पाबाबत प्रचंड चर्चा झाली, त्याच्या कामाला सुरवात करण्याची घोषणाही सत्ताधारी भाजप नेत्यांनी केली होती. त्याकरिता महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात दोनशे कोटींची तरतूद केली आहे.

त्यामुळे या मार्गाच्या कामाला गती येण्याची शक्‍यता होती. प्रत्यक्षात मात्र केवळ चर्चाच झाल्याने मार्गाच्या कामाला अडथळे निर्माण झाले आणि आचारसंहितेआधी वर्क ऑर्डर देणे शक्‍य झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीनंतर काम सुरू
गेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपच्या अजेंड्यावरील "जायका' प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी (एसटीपी) सुमारे साडेचारशे कोटींची निविदा काढण्यात आली आहे. परंतु, या दोन्ही प्रकल्पांच्या ठेकेदारांना "वर्क ऑर्डर' देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पांची कामे निवडणुकीनंतर सुरू होतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पातील छोट्या-मोठ्या विशेषतः प्रमुख रस्ते, उद्याने, शाळा, दवाखाने आदी योजनांची उद्‌घाटने, भूमिपूजने पुढे ढकलावी लागली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com