शैक्षणिक दर्जासाठी घ्यावा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नगरसेवकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. स्वयंसेवी संस्थांची मदत घेतानाच महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे महत्त्व कमी होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी विविध मते सर्व साधारण सभेत मांडण्यात आली. 

महापालिकेच्या शाळांत नववी आणि दहावीचे वर्ग स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावर नगरसेविका आरती कोंढरे यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डातील शाळांतील शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्वयंसेवी संस्थांना वर्ग चालविण्यासाठी देण्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या आदेशावरच आक्षेप घेतला. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. दिलीप बराटे यांच्यासह काही नगरसेवकांनी स्वयंसेवी संस्थांच्या कामावर आक्षेप घेतले. यानंतर विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याची आवश्‍यकता असल्याचे मत मांडले.

Web Title: Municipal School Education Quality Initiative