राजकीय दबाव जुगारून ऑनलाइन बदल्या

Teacher
Teacher

४६ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
पिंपरी - महापालिकेच्या एकाच शाळेत गेल्या २५ वर्षे ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या विरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. राजकीय दबाव झुगारत तब्बल ४६ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी (ता. १२) शिक्षकांच्या हातांमध्ये बदल्यांचे आदेश पडले.

सोयीच्या ठिकाणी बदल्या न मिळाल्याने शनिवारी (ता. १३) सुटी असतानादेखील अनेक शिक्षक बदली रद्द करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशी घेऊन आल्याचे समजते. 

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक विभागाकडून दरवर्षी समायोजनाने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येते. राज्य सरकारच्या सूचनांनुसार संपूर्ण बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. बदलीस पात्र व विनंतीसाठी ऑनलाइन माहिती भरणे आवश्‍यक होते. मात्र, राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी थेट ऑनलाइन बदल्या केल्या आहेत. त्या बदलीपत्रावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची स्वाक्षरी असल्याने अनेक शिक्षकांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.  

सरकारी नियमाप्रमाणे तीन किंवा पाच वर्षानंतर महापालिका प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये स्थानिक पुढाकाऱ्यांच्या आशीवार्दाने काही शिक्षकांनी २५ वर्षे काढली. अशा शिक्षकांच्या शाळांची यादी तयार करून छाननी करण्यात आली. त्यात ४४ मराठी माध्यमांची, तर दोन उर्दू माध्यमातील शिक्षक आढळले. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एका शाळेत १४  ते २५ वर्ष अध्यापन करत असलेल्या ३३ उपशिक्षकांचा समावेश आहे. त्यानंतर १० ते २० वर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या १२ पदवीधर शिक्षक, तर उर्दू माध्यमिक शाळांमधील दोन उपशिक्षकांची बदली करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये रिक्त जागा आहेत, तेथे या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक महिला शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षकांना बदली आदेश मिळाल्यानंतर सोमवारीच (ता. १५) संबंधित शाळेमध्ये रुजू व्हावे लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com