अध्यक्षपदाकडे ‘डोळे’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार असून, या सदस्यांतील एकाची निवड समितीच्या अध्यक्षपदी होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद मार्चच्या पहिल्या आठवड्यात निश्‍चित होणार असून, ते कोणत्या गटाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचे दोन्ही आमदार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र, भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे, मावळ व शिरूर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहेत. या निवडणुकीचा परिणाम स्थायी समितीच्या नावांवरही होण्याची शक्‍यता होती. 

आता भाजपच्या अंतर्गत गटांत नावांवरून पुन्हा रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीराख्यांची वर्णी गेल्या दोन्ही वर्षांत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी लागली. तर, आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांना दोन्ही वेळा महापौरपद मिळाले. दोन्ही वेळा पदे मिळविण्यासाठी पक्षातील निष्ठावंत गटातील नगरसेवकांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 

लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक असल्यामुळे दोन्ही आमदार त्यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे.

महापौरपदाची अडीच वर्षेही विधानसभा निवडणुकीच्या आसपास पूर्ण होणार आहेत. त्यामुळे नवीन महापौरांची निवड सप्टेंबरमध्ये होईल. त्या जागेकडे वरिष्ठ नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे. स्थायी समितीच्या सोळा जागांपैकी भाजपकडे दहा जागा व त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्ष गटाकडे एक जागा आहे.

सदस्यांची मुदत एक की दोन वर्षे?
या समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्षे असते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी दर वर्षी सर्व ११ सदस्य नवीन निवडण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्याची अंमलबजावणी यंदाही केली जाणार का, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड मार्चच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर समितीतीत गेल्या वर्षी निवडलेल्या भाजपच्या उर्वरित सहा सदस्यांना राजीनामे देण्यात सांगण्यात येऊ शकते. त्यानंतर मार्चमध्ये नवीन सदस्यांनी निवड होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य, तसेच शिवसेनेच्या एका नगरसेवकाचीही निवड सर्वसाधारण सभेत केली जाईल.

Web Title: Municipal Standing Committee Chairman Selection Politics