भाजपच्या १०, तर राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्ष आघाडीचा प्रत्येकी एक यांची नियुक्ती झाली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते.

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्ष आघाडीचा प्रत्येकी एक यांची नियुक्ती झाली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते.

स्थायी समिती सदस्यपदासाठी निवड झालेल्यांमध्ये सीमा सावळे, आशा शेंडगे, हर्शल ढोरे, लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, कोमल मेवानी, माधुरी कुलकर्णी, उषा मुंढे, निर्मला कुटे, कुंदन गायकवाड (सर्व भाजप), अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ (राष्ट्रवादी), अमित गावडे (शिवसेना) आणि कैलास बारणे (अपक्ष) यांचा समावेश आहे. गटनेत्यांनी नामनिर्देशनाद्वारे नगरसेवकांची नावे दिली होती.

अन्य विषय समित्यांवर पक्षीय संख्याबळानुसार भाजप प्रत्येकी पाच, राष्ट्रवादी प्रत्येकी तीन आणि शिवसेना प्रत्येकी एक सदस्य अशी संधी मिळाली आहे. नियुक्ती झालेले सदस्य पुढीलप्रमाणे -
विधी समिती - शारदा सोनवणे, स्वीनल म्हेत्रे, सुरेश भोईर, अश्‍विनी जाधव, शीतल शिंदे (सर्व भाजप), स्वाती काटे, संतोष कोकणे, जावेद शेख (राष्ट्रवादी), मीनल यादव (शिवसेना).

शहर सुधारणा - विकास डोळस, शैलेश मोरे, सागर गवळी, शशिकांत कदम, संतोष कांबळे (सर्व भाजप), मयूर कलाटे, गीता मंचरकर, विनया तापकीर (सर्व राष्ट्रवादी), अश्‍विनी वाघमारे (शिवसेना).

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक - अंबरनाथ कांबळे, भीमाबाई फुगे, बाळासाहेब ओव्हाळ, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र गावडे (सर्व भाजप), मंगला कदम, डब्बू आसवानी, राजू बनसोडे (राष्ट्रवादी), ॲड. सचिन भोसले (शिवसेना).

महिला व बालकल्याण - योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, सागर आंगोळकर (सर्व भाजप), डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, निकिता कदम (सर्व राष्ट्रवादी), रेखा दर्शले (शिवसेना).

राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नाकारला सत्कार
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना नवीन कार्यालय न दिल्याने नाराज झालेले बहल यांच्यासह राष्ट्रवादीच्या विषय समिती सदस्यांनी महापौरांकडून सत्कार स्वीकारला नाही. बहल म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यासाठी सध्या असलेले विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपुरे पडत आहे. नवीन कार्यालय मिळावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच मी व विषय समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांनी महापौरांकडून सत्कार नाकारला.’’

स्थायी आणि अन्य चार विषय समित्यांसाठी चर्चा करून भाजप नगरसेवकांची एकमताने नियुक्ती केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, तसेच पक्षातील अन्य वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थायी व अन्य विषय समित्यांचे सभापती निवडणुकीद्वारे निवडले जातील.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Web Title: municipal standing committee member selection