municipal teachers have to do Corona duty even after state government order
municipal teachers have to do Corona duty even after state government order

शिक्षकांना अजूनही कोरोनाची ड्युटी, ऑनलाईन शिकवायलाही मिळेना वेळ!

पुणे :  राज्य सरकारने शिक्षकांना 'कोरोना'च्या कामातून मुक्त करण्याचे आदेश दिले असले तरी महापालिकेने सुमारे ५५० शिक्षकांना 'कोरोना'च्या कामात लावले आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांपुढे चांगल्या दर्जाच्या शिक्षणाचे आव्हान असताना हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीत. यामुळे पालकही मुलांना खासगी शाळेत प्रवेश देण्याच्या विचारात आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात मार्च महिन्यापासून 'कोरोना'चे थैमान सुरू आहे. या काळात पुणे शहरात अडकून पडलेल्या मजुरांची शाळेत व्यवस्था करणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडली. मार्च ते १५ जून पर्यंत शिक्षकांनी महापालिकेने नेमून दिलेले काम केले होते. त्यानंतर त्यांना काही दिवस आराम देण्यात आला होता. दरम्यान, जून महिन्यात यंदा शाळा कशा सुरू  असताना 'कोरोना'च्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने २४ जून रोजी दिले. त्यानंतरही महापालिकेने ५५० शिक्षकांना पुन्हा 'कोरोना'च्या कामासाठी बोलावून घेतले आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाच्या आधारे या शिक्षकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन यातून सुट देण्याची मागणी केली आहे. पण त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला. त्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

शिक्षक एक वर्ग अनेक 
महापालिकेच्या शाळेत झोपडपट्टी व गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षकांची संख्या कमी असताना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांमध्ये शिक्षण पोहोचविणे गरजेचे आहे. मात्र, आता या कामात अडकलेल्या शिक्षकांनी त्यांचा वर्ग दुसऱ्या शिक्षकांकडे दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गाकडे ऑनलाईन लक्ष ठेवणे शक्य होत नाही. तसेच विद्यार्थ्यांचे आई वडील जेव्हा घरी असतात त्याचवेळी त्यांना मोबाईल वापरता येतो. 

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

"लाॅकडाऊन काळात शिक्षकांनी काम केले, सर्वेक्षण केले, त्यास आमचा विरोध नव्हता. राज्य शासनाने शिक्षकांना कोरोना'च्या कामातून मुक्त करा असे आदेश दिल्याने आम्ही तशी मागणी करत आहोत. राज्यात सध्या कुठेही शिक्षक या कामात नाहीत फक्त पुणे मनपाचे शिक्षकच आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे."
- सचिन डिंबळे, शिक्षक नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ


"मनपाचे कर्मचारी व शिक्षक यांच्यात तुम्ही भेद करू नका. ते शिक्षक मनपाचे कर्मचारी असल्याने त्यांना वाॅर रुममध्ये फोन करण्याचे काम दिले आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काहीही परिणाम झालेला नाही."
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा

रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 


"माझी मुलगी नगर रस्त्यावरील मनपा शाळेत शिकते. तिचे मुळ शिक्षक कोरोना'च्या कामात असल्याने दुसरे शिक्षकतिला व्हॉट्सअ‍ॅपवर रोज अभ्यास पाठवतात. पण तो कसा शिकवावा हे आम्हाला कळत नाही. खासगी शाळेत जाणारी शेजार्यांची मुलं रोज अभ्यास करतात पण आमचे मुलं बाहेर फिरतात. मनपाने ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा करावी अन्यथा नाईलाजाने मुलीला खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. 
- बालाजी ओव्हाळ, पालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com