उद्यानाच्या नामांतरासाठी पुण्यात नागरिकांचे अभिनव आंदोलन

सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमचे दिड महिन्यांपासून आंदोलन
municipality Salisbury Park agitation of citizens of Pune renaming the park
municipality Salisbury Park agitation of citizens of Pune renaming the parksakal

पुणे : महापालिकेच्या सॅलिसबरी पार्कमधील नव्या उद्यानाला स्थानिक नगरसेवकाने त्याच्या वडिलांचे दिलेले नाव काढून टाकावे, यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशनने रविवारी अभिनव आंदोलन केले. त्याला युवकांसह परिसरातील रहिवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. गेल्या दीड महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. सॅलिसबरी पार्कमधील महापालिकेच्या नव्या उद्यानाला स्थानिक माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे दिले आहे.

त्याच्या निषेधार्थ सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमने आंदोलन सुरू केले आहे. या बाबत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेही दाद मागितली आहे. परंतु, त्यांनी फक्त आश्वासन दिल्याचे फोरमचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर फोरमच्या सदस्यांनी उद्यानासमोर रविवारी आंदोलन केले. त्यात ‘लिखे जो खत तुझे’तंर्गत नागरिकांना salisburyparkrf@gmail.com या ई-मेलवर रिप्लाय पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

त्यासाठी त्यांना "नागरिकांच्या पैशातुन उभ्या राहिलेल्या व ४० वर्ष सिटीझन- प्रोटेस्ट करून, स्वखर्चाने सुप्रीम कोर्टात केस जिंकून जी वास्तू/जागा मिळवली त्याला कुठल्याही व्यक्तीचे नाव देउ नये, असे सॅलिसबरी पार्कच्या रहिवाशांना वाटते. स्थानिक नागरिकांनी भिमाले यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले की, हा उद्यानाचा मुद्दा मागील ४० वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे या उद्यानाला खाजगी व्यक्तीचे नाव द्यायचे नाही. त्यावर भिमाले यांनी उद्यानाला कुणाचेही नाव न देण्याबाबत नागरिकांना होकर दर्शवला होता शहरातील सार्वजनिक उद्यानाला फक्त राष्ट्रीय नेते आणि दिग्गज पर्यावरणवाद्यांची नावे द्यावीत असे महापालिकेच्या २७ जुलै २००० च्या आदेशात म्हटले आहे. तरीही भिमाले यांनी आधीचा मूळ फलक बदलून त्यांच्या वडिलांचे नाव नवीन उद्यानाला दिले आहे. भिमाले यांनी लावलेला बेकायदेशीर व अनैतिक फलक उतरविण्यासाठी जे आंदोलन सुरु केले आहे त्यात तुम्ही आमच्या सोबत आहात का? आणि ते उचित आहे असे तुम्हाला वाटते का ?’ अशा आशयाच्या मजकुरावर फोरमने नागरिकांच्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. त्याचे संकलन करून महापालिकेला देण्यात येणार असल्याचे फोरमच्या सदस्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com