हत्येची सुपारी दिल्याचे प्रकरण; पोलिस अधिकाऱ्यांचे फोन कॉल लोकेशन सादर करा

गोळीबाराचा बदला घेण्यासाठी एकाच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात न्यायालयाने पोलिसांचे फोन कॉल लोकेशन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
phone call location
phone call locationsakal
Summary

गोळीबाराचा बदला घेण्यासाठी एकाच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात न्यायालयाने पोलिसांचे फोन कॉल लोकेशन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे - गोळीबाराचा (Firing) बदला घेण्यासाठी एकाच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात न्यायालयाने (Court) पोलिसांचे फोन कॉल (Phone Call) लोकेशन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना पोलिसांनी नेमके कधी ताब्यात घेतले हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने कोंढवा पोलिसांना (Police) हा आदेश दिला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

कँटोन्मेंट बोर्डामधील भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक विवेक यादव (वय ३८, रा. वानवडी) या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात यादव यांच्यासह राजन जॉनी राजमनी (वय ३८, रा. कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकूब शेख (वय २७, रा. वाकड) या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू गवळी याने पूर्ववैमनस्यातून विवेक यादव याच्यावर २०१६ मध्ये गणेशोत्सवादरम्यान गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी विवेक यादवने राजमनी आणि शेख यांना गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.

phone call location
शिवनेरीवरील शंभर फुटी भगवा ध्वजासाठी परवानगी द्यावी; डॉ. कोल्हे

या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी फौजदारी प्रक्रीया संहितेचे कलम ९१ नुसार पोलिस अधिकाऱ्यांचे १३ आणि १४ जुलै रोजीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) रिपोर्ट मागितले. शेख याच्यावतीने ॲड. देबुजित तालुकदार यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. कागदपत्रांची पाहणी करून कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी प्रभाकर कापुरे व फिर्यादी पोलिस नाईक सुशील दिवार (कोण) यांचे १४ जुलै रोजीचे सकाळी १० ते संध्याकाळी पाचपर्यंतचे फोन लोकेशन सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

आरोपींना १३ जुलैलाच ताब्यात घेतले : आरोपींचे वकील

राजमनी आणि शेख यांना या गुन्ह्यात १४ जुलै रोजी लुल्लानगर पुलाखाली बीज खाली अटक केली. त्यांच्याकडे एक बंदूक सापडली होती, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मात्र शेख याला १३ जुलै रोजी पोलिस नाईक दिवार व तपास पथकाने चांदणी चौकातून आणि राजमनी याला पोलिसांनी एनआयबीएम रस्ता येथून ताब्यात घेऊन कोंढवा पोलिस ठाण्यात बसून ठेवले होते, असे म्हणणे आरोपींच्या वकिलांनी सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com