तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह घरात लटकविला

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

राजगुरूनगर (पुणे) : तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह घरात लटकवून ठेवल्याची घटना आज (ता. १८) चास (ता. खेड) येथे घडली. योगेश ईश्वर वाघमारे (वय २४, रा. चास, ता. खेड, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मृत योगेशची बहीण योगिता गौरव जैद ( वय २३, रा. जैदवाडी, ता. खेड) हिने फिर्याद दिली आहे. तिचा भाऊ योगेश हा बेबीकॉर्न मका विक्री एजन्सीचा व्यवसाय करीत होता आणि चास येथे राहत होता. आज सकाळी दहा वाजता योगेशचा मृतदेह चास येथील राहत्या घरी छताला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबलेला होता. त्याचे हात पुढील बाजूस वायरने बांधलेले होते. तसेच दंडाजवळ दोरीने बांधलेले होते आणि गळ्यात दोरी लावलेली होती. त्यावरून त्याचा खून झाल्याची खात्री झाली. मृत योगेश करीत असलेल्या बेबीकॉर्न विक्री व्यवसायावरून किंवा मालमत्तेवरून खून झाला असावा असा  तिचा संशय असून पाच जणांची नावे तिने फिर्यादीत दिली आहेत. खेड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मृत योगेशचे वडील दहा महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने वारले. आई लहानपणीच त्यांना सोडून निघून गेलेली आहे. बहीण प्रेमविवाह करून जैदवाडी येथे पतीकडे राहण्यास गेलेली असल्याने योगेश एकटाच चास येथील घरात राहत होता. त्याच्या मृत्यूने चास परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: murder boy and hang him in home