वडिलांच्या खूनप्रकरणी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

यवत - जमीन विकण्यास विरोध करणाऱ्या वडिलांचा मुलानेच खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. या पथकाने आरोपी सुखराज दगडू टेमगिरे (वय ४०, रा. भरतगाव, ता. दौंड) यास ताब्यात घेऊन जेजुरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास जेजुरी पोलिस पुढील तपास करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

भुलेश्वर डोंगराच्या उत्तर पायथ्याला असलेल्या मठात ६ मे रोजी दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय७०, रा. भरतगाव, ता. दौंड) यांचा खून झाला होता. यवत व जेजुरी पोलिस ठाण्याच्या सीमेवर असलेल्या ओम शांती मठात हा खून झाला होता. आरोपीने मठाच्या ज्या खोलीत खून केला ती खोली कुलूपबंद करून चावी नेहमीच्या ठिकाणी ठेवली होती. अनेक दिवस मठाशी संबंधित असलेल्यांची चौकशी करूनही हाती काही लागत नाही हे पाहून गुन्हे शाखेच्या पथकाने आपला मोर्चा भरतगावकडे वळवला. वेशांतर करून अनेक दिवस पाळत ठेवत हा तपास सुरू होता.

अखेर पथक आरोपींपर्यंत पोचले. आरोपीने वडिलांच्या नावावर असलेली जमीन गावातील एका इसमास विकण्याचे कबूल केले होते. इसारापोटी काही रक्कमही घेतली होती. मात्र, जमीन विकण्यास वडिलांचा विरोध होता. मागील काही दिवसांपासून ते भुलेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या मठात सेवेकरी म्हणून राहात होते. रात्रीच्या वेळी आरोपीने मठाच्या खोलीत झोपलेल्या वडिलांचा खून केला. वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी स्वतः पार पाडले. तपास करणाऱ्या या पथकात सहायक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, दयानंद लिम्हण, अक्षय जावळे यांचा समावेश होता.

Web Title: murder case crime police

टॅग्स