बारामतीच्या तरुणाचा मेहुण्याने केला खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

गोंदी - शीर धडावेगळे करून जायकवाडीच्या कालव्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, केशव गावडे (वय 32, रा. माळेवाडी, ता. बारामती) यांचा हा मृतदेह असून, ते वडीगोद्री (ता. अंबड) येथे सासुरवाडीला राहत होते. अनैतिक संबंधाच्या संशयावरून मेहुण्यानेच हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मेहुणा रामभाऊ अशोक लिपणे (रा. वडीगोद्री) याने चुलत सासरा विष्णू भागुजी शिंगाडे (रा. पुणे) याच्या मदतीने हा खून केला. रामभाऊ आणि विष्णू यांना पोलिसांनी अटक केली. अंबड न्यायालयाने त्यांना 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रविवारी (ता. 10) पिठोरी सिरसगावनजीक जायकवाडीच्या कालव्यात शीर धडावेगळे करून फेकलेला मृतदेह आढळला होता. केशव बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी त्यांचे भाऊ सर्जेराव गावडे बुधवारी (ता.13) गोंदी पोलिस ठाण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी मृतदेहाचे फोटो दाखविल्यावर केशवची ओळख पटली. पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे व अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: murder crime