भाच्याकडून मामाचा खून

Sanaul Shaikh
Sanaul Shaikh

पिंपरी - ज्यूस व्यवसाय स्पर्धेच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून ज्यूस विक्रेत्या मामाचा खून भाच्याने केल्याची घटना रविवारी (ता. 30) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी चार आरोपींना भुसावळ येथून ताब्यात घेतले आहे. सनाऊल हक सय्यद शेख (वय 32, सागर लांडगे चाळ, भोसरी), असे खून झालेल्याचे नाव आहे.

सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सातच्या सुमारास स्मशानभूमीजवळील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना त्याचा खून झाल्याचे दिसून आले. मृतदेहाजवळील कागदपत्रांची पाहणी करून त्यानुसार संपर्क केला. पोलिसांच्या सांगण्यावरून आलेल्या व्यक्तींनी मृताची ओळख पटविली. मृत व्यक्तीच्या भोसरीत भागीदारीत रस्त्यावर तीन ठिकाणी ज्यूसच्या हातगाड्या आहेत. रात्री दहाच्या सुमारास चार जण सनाऊल यास बोलविण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी आले नाहीत. सकाळी त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, या खुनाच्या घटनेचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली, की सनाऊल यांचा भाचा त्यांच्याकडे कामाला होता. मात्र, वर्षभरापूर्वी त्याने स्वतः ज्यूसचा व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी भाचा काही जणांना घेऊन मामा सनाऊल यांना मारहाण करण्यासाठी आला होता. त्यानंतरही वाद सुरू होते. याच वादातून भाच्याने मामाचा काटा काढला. त्यानंतर आरोपी गीतांजली एक्‍स्प्रेसने पश्‍चिम बंगालकडे जाण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जळगाव रेल्वे स्टेशनपासून पोलिस गीतांजली एक्‍स्प्रेसमध्ये आरोपींचा शोध घेत होते. दिलेल्या वर्णनाच्या व्यक्‍ती आढळल्यानंतर पोलिसांनी चौघांना भुसावळमध्ये बेड्या ठोकल्या. भोसरी पोलिसांचे पथक आरोपींना आणण्यासाठी रविवारी दुपारीच रवाना झाले आहे. भाच्यासह आरोपींच्या अटकेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com