हप्तेवसुलीच्या वादातून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून हप्तेवसुली आणि हद्दीच्या वादावरून हा खून केल्याचे उघड झाले आहे. 

पुणे - जनता वसाहतीमध्ये सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रहिवाशांकडून हप्तेवसुली आणि हद्दीच्या वादावरून हा खून केल्याचे उघड झाले आहे. 

योगेश राजेंद्र जांभळे (वय २६) व अभिजित गणेश कडू (वय २६, दोघेही रा. जनता वसाहत) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत; तर नवनाथ वाल्हेकर, सुनील डोकेफोडे ऊर्फ चॉकलेट सुन्या, अविनाश देवकुळे, नितीन मेटकरी, समीर नाटेकर ऊर्फ काळ्या दाद्या, अक्षय अंबवणे, शुभम, राकेश शिंपी, सोहेल शेख, सौरभ आढाव, राज आढाव, पप्पू गायकवाड, पप्पू भरेकर व आतिष माळी (सर्व रा. जनता वसाहत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नीलेश कदम (वय २८) याने फिर्याद दिली. नीलेश संभाजी वाडकर (वय ३७) असे खून झालेल्याचे नाव आहे. 

वाडकर व चॉकलेट सुन्या यांच्यामध्ये हप्तेवसुली व हद्दीवरून वाद होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून दोन्ही गुंडांच्या गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, रविवारी रात्री सातच्या सुमारास जनता वसाहतीमधील खुडे निवासस्थानाजवळ दोन्ही गट समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये वाडकरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. या वेळी गोळीबार केल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक रवींद्र सेनगावकर, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी दत्तवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक देविदास घेवारे करत आहेत.

Web Title: Murder Crime