प्रेयसीसह आईचा खून; आरोपीला दुहेरी जन्मठेप

Court
Court

पुणे - एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह तिच्या आईचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टी यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

सुनील शंकर पवार (वय २३, रा. कांबरे खेबा, भोर), असे आरोपीचे नाव आहे. सुनील याने काजल शिंदे (वय १९) आणि संगीता शिंदे (वय ४०, दोघीही रा. पारगाव वस्ती, भोर) यांचा खून केला होता. हवालदार भारत चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. २३ मार्च २०१४ रोजी काजल हिचा एका मुलाबरोबर टिळा झाला होता, त्यामुळे संतप्त सुनीलने २७ मार्चला काजलला तिच्या घराजवळच्या शेतात बोलावले व जाब विचारला. तेथे तिची आईही होती.

टिळ्यावरून वाद झाल्याने सुनीलने काजलवर कुऱ्हाडीने वार केला. या वेळी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, नंतर त्याने संगीता यांच्यावरही हल्ला केला होता. दोघी जमिनीवर कोसळल्यानंतर त्याने त्यांच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्‍यात वार करून खून केला. त्यानंतर हत्यार घेऊन तो राजगड पोलिस ठाण्यात हजर झाला व गुन्ह्याची कबुली दिली होती. सरकारी वकील सुनील हांडे यांनी १२ साक्षीदार तपासले. दंडाची रक्कम काजलच्या वडिलांना द्यावी, असे निकालात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com