आर्थिक वादातून पुण्यात मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे : हडपसर येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका तरुणावर त्याच्या मित्राने चाकूने वार करुन खून केला. राहुल पाटील व ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
पुणे : हडपसर येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता एका तरुणावर त्याच्या मित्राने चाकूने वार करुन खून केला. राहुल पाटील व ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आर्थिक वादातुन हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल व त्याच्या मित्रामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. त्यावरुनच सोमवारी रात्री हडपसरमधील अंगुर वाइन्स येथे राहुल व त्याच्या मित्राची बाचाबाची झाली. त्यानंतर मित्राने आणलेल्या चाकूने राहुलवर वार करुन खून झाला. 

Web Title: murder of friend due to financial issue in Pune

टॅग्स