नगरसेवक घनशाम खेडकर यांच्या पुतण्याचा खून

विलास काटे
मंगळवार, 3 जुलै 2018

नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या खूनानंतर आठवडाभरातच दुसरी घटना घडल्याने परिसरात अद्याप दहशतीचे वातावरण आहे.
 

आळंदी - पिंपरी महापालिकेचे माजी नगरसेवक घनशाम खेडकर यांच्या पुतण्यावर अनोळखी टोळक्याने हल्ला करून खून केला. ही घटना आळंदीत देहूफाटा येथे मध्यरात्री घडला असून खुनाचे कारण अद्याप समजले नाही. मात्र नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या खूनानंतर आठवडाभरातच दुसरी घटना घडल्याने परिसरात अद्याप दहशतीचे वातावरण आहे.

राजेंद्र दिगंबर खेडकर (वय-30 रा. चहोली, ता. हवेली) असे मयताचे नाव आहे. ज्या ठिकाणी खूनाची घडली त्याठिकाणी आळंदी पालिका माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या इमातीत मटक्याचा अड्डा अनाधिकृतपणे चालविला जात होता. यामुळे याठिकाणी अनेक गुन्हेगारांचा वावर सदोदित चालू होता. देहूफाटा, काळे कॉलनी चौक गुन्हेगारांचा अड्डा झाला होता. आता मध्यरात्री हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The murder of niece of corporator Ghansham Khedkar