दारूड्या पतीने केला पत्नीचा खून

दारूड्या पतीने केला पत्नीचा खून

पिंपरी - दारूड्या पतीने आपल्या दोन लहान मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून खून केला. तिला बाथरूममध्ये बंद करून घरातून धूम ठोकली. मुलांनी टाहो फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ८) मध्यरात्री रहाटणी येथे घडली. 

वंदना जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, उत्तम महादू जाधव (वय ३६, रा. रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत वंदना यांचा भाऊ पुंडलिक श्‍यामराव वाघमारे (वय ३४) यांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम दररोज दारू पिऊन वंदना यांच्यासह मुलगी दीपाली (वय १०) आणि मुलगा ओंकारला (वय ८) मारहाण करत असे. बुधवारी दुपारी आणि रात्रीही त्यांच्याशी भांडत राहिला. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास आपल्या आईचा वडिलांनी निळ्या रंगाच्या वायरने गळा आवळल्याचे मुलांनी पाहिले. बेशुद्ध झालेल्या वंदना यांना त्याने बाथरूममध्ये टाकले व पळून गेला. वडील गेल्याचे कळताच मुलांनी टाहो फोडला. जवळच राहत असलेला वंदना यांचा भाऊ आणि बहीणही घरी आले. त्यांनी बेशुद्ध वंदना यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com