लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा गळा आवळून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - लग्नास नकार दिल्याने सराईत गुन्हेगाराने व त्याच्या मित्राने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या मुलीचा मृतदेह इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळसदेव ते काळेवाडी या दरम्यान नेऊन टाकला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रझिया शेख हिचा खून झाला आहे. सोहेल मेहबूब शेख ऊर्फ बादशहा (वय 33, दोघे रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) व आरिफ उमर दरारशी शेख (वय 23) यांना अटक केली आहे.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव बाबर म्हणाले, ""सोहेल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचे रझियाचे प्रेमसंबंध होते. तो तिला लग्न कर असे म्हणत होता. परंतु, सोहेलचे यापूर्वी एक लग्न झाले आहे. त्याला तीन मुलेही आहेत. त्यामुळे रझिया त्याच्याशी लग्न करण्यास नकार देत होती. त्यातून त्या दोघांमध्ये वेळोवेळी वाद होत होते. काही दिवसांपूर्वी त्याने रझियाला दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना पाहिले.''

मंगळवारी (ता. 29) मध्यरात्रीपासून गुलटेकडी येथून मुलगी हरविल्याची तक्रार स्वारगेट पोलिस ठाण्यात तिच्या वडिलांनी दिली होती. त्यानंतर तिचा शोध सुरू केला. सोहेलने या मुलीचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर त्याला आज दुपारी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत लग्नास नकार दिल्याने व दुसऱ्या मुलासोबत फिरताना पाहिल्याने मंगळवारी मध्यरात्री रझियाचा अरीफच्या मदतीने ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. रझियाचा मृतदेह पळसदेव ते काळेवाडी या दरम्यान फेकून दिला असून, तो ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

Web Title: murder in pune