डोक्यात दगड घालून तळेगावात एकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

चार ते पाच जणांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड घालून युवकाचा खून केला.

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यालगतच्या शर्मा काॅम्प्लेक्स लगतच्या एका हार्डवेअर दुकानाशेजारी एका युवकाचा डोक्यात दगड घालून दिवसाढवळ्या खून केल्याचा प्रकार आज (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास घडला. अनिल पानसरे (25, वनी-दिंडोरी, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, चार ते पाच जणांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड घालून खून केला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुढे पाठवला. मयत अनिल हा वाहनचालक असून खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला. याचा तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Murder in Talegaon