तळेगाव दाभाडेत दोघांवर कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

तळेगाव स्टेशन - किरकोळ भांडणावरुन दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथील डाळ आळीमध्ये गणपती मंदिरासमोर सोमवारी (ता.०३) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. अमोल भिवा चुकाटे (२५,डाळ आळी,तळेगाव दाभाडे) आणि अजय महादेव भंडलकर (२३,डाळ आळी,तळेगाव दाभाडे) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर गस्तीवर असलेले तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी त्वरित घटनस्थळी धाव घेतली. चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून, बाकी तीन फरार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

याप्रकरणी जखमी अजय भंडलकर याने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरुन चौघा आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे आणि गंभीर जखमी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Murder at Talegaon Area In Pune