जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणार्या ट्रकचालकाचा खून

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी हा टेम्पो थांबवून लूट केली.
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी हा टेम्पो थांबवून लूट केली.

दौंड (पुणे) - सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणार्या ट्रकचालकाला मळद (ता. दौंड) जवळ लुटून त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. तर एका टेम्पो मदतनीसावर चाकूने वार करण्यात आले आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार के. बी. शिंदे व पोलिस कॅान्स्टेबल शरद वारे यांनी आज (ता. ३० ) या बाबत माहिती दिली. काशिनाथ रामभाऊ कदम (वय ५५, रा. ढोकी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. लातूर येथून सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गाने २९ मार्च रोजी तीन ट्रक हरभरा दाळ घेऊन पुण्याकडे निघाले होते.

आज (ता. ३०) मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद येथे वृंदावन हॅाटेलच्या पुढे त्यापैकी एक ट्रकचालक काशिनाथ कदम हे ट्रक (एम.एच. २५, यू. ४२०१) महामार्गावर थांबवून लघुशंकेसाठी गेले होते. त्या दरम्यान सेवा रस्त्याने आलेल्या पाच ते सहा अज्ञात तरूणांनी काशिनाथ कदम यांच्या छातीवर चाकूने वार करीत त्यांच्या खिशातील मोबाइल संच, वाहन चालविण्याचा परवाना व रोख तीन हजार रूपये काढून घेतले. ट्रकचा मदतनीस शकील शेख याने प्रसंगावधान राखून काशिनाथ कदम यांना ट्रक मध्ये ओढून घेत ट्रक पाटस टोल नाक्यापर्यंत स्वतः चालवत नेला. तेथून रूग्णवाहिकेत श्री. कदम यांना यवत (ता. दौंड) येथे नेण्यात आले परंतु उपचारापूर्वी काशिनाथ कदम यांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान अन्य एका प्रकरणात महामार्गावर दरोडेखोरांनी टेम्पो (क्रमांक एम.एच. १२, एच. डी. १३११) मदतनीस महंमद मेहबूब पठाण (वय. ४९, रा. उस्मानाबाद) यांच्यावर देखील चाकूने वार करून त्यांच्याकडील मोबाइल संच काढून घेत पळ काढला. महंमद पठाण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर चोरट्यांनी टेम्पोचालक अल्ताफ खैय्यूम पटेल (रा. सेंद्री, ता. बार्शी. जि. सोलापूर) याच्याकडील रोख दोन हजार रूपये, वाहन चालविण्याचा परवाना व पैशांचे पाकिट काढून घेत पळ काढला. 

अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, उप अधीक्षक एेश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दौंड पोलिस ठाण्यात या बाबत शकील शेख यांनी फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक सुनील महाडीक या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com