विद्येच्या माहेरघरात दोन तरुणांचा खून; पोलिस प्रशासन मात्र...

Crime1.jpg
Crime1.jpg

कोथरुड/ हडपसर (पुणे) :  कोथरूडमध्ये धारधार शस्त्राने वार करत एका तरुणावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच आज हडपसमध्येही खूनाची घटना घडली. त्यामुळे शहर या घटनांमुळे हदरलं आहे. धारदार शस्त्राने वार करत राकेश क्षीरसागर (वय 25, लक्ष्मीनगर, डहाणूकर काॅलनी) या युवकावर गुंडाच्या टोळक्याने हल्ला  केला. यात त्या तरूणाचा मृत्यू झाला. कोथरूड मधील गांधी भवन चौकात असलेल्या आर के बाईक पाॅईंट या दुचाकी गॅरेजमध्ये दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच आज हडपसरमध्ये चिकन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे चिकन विक्रेत्यांकडून दैनंदिन पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडील पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने चिकन विक्रेत्याकडील कामगाराने चाकूने वार करुन खून केला. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजता हडपसरमधील साडेसतरानळी या गावात घडली. आरोपीने चिकन कापण्याठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने वार केले. हडपसर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

आकाश लक्ष्मण भोसले (वय २४, रा. उन्नती नगर, हडपसर,मुळ रा. निलंगा, लातूर ) असे खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. लहु बन्सी शिंदे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भोसले हा आमिर चिकन या शहरात चिकन पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे त्यांचे दररोज चिकन विक्रेत्याकडील पैसे जमा करण्याचे काम करीत होता. आकाश हा सगळीकडे फिरत असल्याने त्याच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत असत. दरम्यान, साडेसतरानळी येथील होळकर यांच्या मालकीच्या दुकानात काम करणाऱ्या लहु शिंदे यास माहिती होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार आकाश सोमवारी चिकन विक्रेत्याकडील पैसे जमा करीत चार वाजता होळकर यांच्या चिकनच्या दुकानात गेला. त्यावेळी शिंदे याने आकाशकडील पैसे चोरण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चिकन कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने डोक्यावर व गळ्यावर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झाला होता, त्यास तत्काळ रुग्णलयात दाखल केले, मात्र आकाशचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. त्यानंतर लहुने त्याच्याकडील पैसे घेऊन तो पसार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानी आरोपीचा माग काढत त्यास तत्काळ अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com