मद्याच्या नशेत पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे ः किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात मद्याच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीचा खून केला. ही घटना मुळशी तालुक्‍यातील मुलखेड गावात घडली. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ः किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात मद्याच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीचा खून केला. ही घटना मुळशी तालुक्‍यातील मुलखेड गावात घडली. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवकी सुदाम जाधव (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस पाटील सुनील तापकीर यांनी फिर्याद दिली. मुलखेड गावाच्या शेनकी शिवारात सुदाम याचे किरकोळ कारणावरून पत्नी देवकी यांच्यासोबत भांडण झाले. त्यानंतर आरोपीने मद्याच्या नशेत देवकी यांना काठीने जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवकी यांचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर तापकीर यांनी पौड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल केला. फौजदार एन. एस. मोरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: murder of wife in pune