दौंडच्या रेल्वे मालधक्क्यात महिलेचा खून, मृतदेह जाळला

प्रफुल्ल भंडारी 
मंगळवार, 12 जून 2018

दौंड (पुणे) - दौंड शहरातील रेल्वेच्या मालधक्का परिसरात एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

दौंड (पुणे) - दौंड शहरातील रेल्वेच्या मालधक्का परिसरात एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

दौंड शहरातील टपाल कार्यालयासमोरून मालधक्क्याकडे जाणार्या रस्त्यावर आज (ता. १२) सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. मृत महिलेचे अंदाजे वय २२ ते २५ दरम्यान आहे. मध्यरात्री किंवा पहाटे सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाजवळ पाच लिटरचे एक रिकामे कॅन आढळून आल्याने रॅाकेल किंवा पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. रेल्वेच्या कॅरेज अॅण्ड वर्क्स (सी अॅण्ड डब्ल्यू) कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मृतदेह सापडल्याने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. 

रेल्वेच्या हद्दीत खुनाचा प्रकार होऊनदेखील दौंड लोहमार्ग पोलिस किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी फिरकले देखील नाहीत. दौंड पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह लिंबाचा पाला टाकून झाकला. दौंड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. 

दौंड पोलिसांनी सदर मृतदेह विच्छेदनासाठी शहरातील उप जिल्हा रूग्णालयात दाखल केला आहे. परंतु तेथे विच्छेदनासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दुपारी पावणेएक वाजेपर्यंत विच्छेदन झालेले नव्हते. 

सदर महिलेला जाळण्यात आल्याने ओळख पटविणे अवघड जात असले तरी तिच्या अंगावरील कपडे, कर्णफुले, जोडवी, बांगड्या, आदींच्या साह्याने ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

Web Title: The murder of a woman in the daund